मान्सूनची माघार लांबणीवर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज

मान्सूनची माघार लांबणीवर: राज्यात मान्सूनची माघार लांबणीवर; ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता.


मान्सूनची माघार लांबणीवर

सकाळ, ६ ऑक्टोबर २०२५: राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. सध्या उत्तर भारतात पश्चिमी आवर्त (Western Disturbance) सक्रिय झाल्यामुळे उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे राज्याकडे वाहण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे मान्सूनच्या माघारीसाठी पोषक वातावरण तयार होईल. हवामान अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी, म्हणजेच १०-११ ऑक्टोबरच्या सुमारास, उत्तर महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करेल.

चक्रीवादळाचा धोका टळला, पण पावसाची शक्यता कायम

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ (Cyclone Shakti) आता ओमानच्या दिशेने सरकले असून, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. मात्र, बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात स्थानिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे.

Leave a Comment