तोडकर हवामान अंदाज ; ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा
४ ते ६ ऑक्टोबर या काळात होणारा पाऊस सर्वदूर नसून त्याची व्याप्ती केवळ ३०% ते ४०% भागापुरतीच असेल. या कालावधीत भाग बदलत मोठे सटकारे पडण्याची शक्यता आहे असे तोडकर यांनी सांगीतले…
४ ऑक्टोबर: नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या पट्ट्यात पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय, तुरळक ठिकाणी परभणी, बुलढाणा, सातारा, आणि जालना येथेही पाऊस होईल.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
५ ऑक्टोबर: ४ तारखेप्रमाणेच चंद्रपूर आणि गोंदिया भागात पावसाची स्थिती राहील…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
६ ऑक्टोबर: ६ तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा अवकाळी पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि या भागांची पावसातून सुटका होईल..(तोडकर हवामान अंदाज)
शेतकऱ्यांसाठी सल्ला आणि पुढील हवामानाचे संकेत
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगले आहे किंवा ज्यांचे सोंगणी बाकी आहे, त्यांनी बिलकुल घाई करू नये. वातावरण ७/८ ऑक्टोबरपासून पुढे सर्वसाधारण होईल, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सात किंवा आठ तारखेनंतर सोयाबीन आणि मका सोंगणीची कामे सुरू करावी.
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनीही ६ तारखेनंतर शेतीची कामे सुरू करणे सुरक्षित राहील. सध्या ऑक्टोबर हीटमुळे दिवसा खूप ऊन जाणवत आहे, मात्र ६/७ तारखेनंतर सकाळचा गारवा वाढेल, जे परतीचा मान्सून गेल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दिवाळीपर्यंतही १०-५ ठिकाणी बुरबूर पाऊस राहू शकतो, परंतु तो शेतीच्या कामांना मोठा अडथळा ठरणार नाही असे तोडकर म्हनाले..