अतिवृष्टीची मदत खात्यात जमा, पण ही भरपाई की चेष्टा? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

अतिवृष्टीची मदत खात्यात जमा: राज्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू; मात्र खात्यात २ ते ५ हजारांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी.


मुंबई:

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वितरणाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी, ज्या शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. मात्र, खात्यावर जमा होणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही मदत आहे की शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम, मदतीवर प्रश्नचिन्ह

गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ २५००, ३०००, ३५०० ते ५०००-६००० रुपये इतकीच रक्कम जमा झाली आहे. एकीकडे सरकारने ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याचे जाहीर केले असताना, प्रत्यक्षात मिळणारी मदत इतकी कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार, जिरायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत अपेक्षित असताना, मिळणारी रक्कम त्याहून खूपच कमी आहे.

Leave a Comment